एसएसएलसी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या बेळगावच्या विद्यार्थिनी अनुषा देसाई हिला आता ६२४ गुण मिळाल्याने तिने प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी असलेल्या अनुषाला सुरुवातीला ६२१ गुण मिळाले होते. निकाल पाहून तिला निराशा झाली होती, कारण विज्ञान आणि गणितात तिला अधिक गुण मिळण्याची खात्री होती. त्यानंतर तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तिला अतिरिक्त ३ गुण मिळाले आणि तिचे एकूण गुण ६२४ झाले. यामुळे तिला खूप आनंद झाला आहे. या यशात शिक्षक, तिचे आई-वडील आणि बहिणींनी मोलाचे सहकार्य केल्याचे तिने सांगितले.

विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा, असे आवाहन करत, अनुषाने भविष्यात वकील किंवा चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची इच्छा व्यक्त केली. प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देतो, पण विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात यश मिळवा, असे आवाहन अनुषाने केले आहे.
अनुषाच्या या यशाबद्दल तिचे पालक आणि शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.


Recent Comments