बेळगावात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर तिसऱ्या आरोपीसह, बाहेरच्या जिल्ह्यातील एका सीपीआयचा मुलगा आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.

टिळकवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या सामूहिक बलात्कार प्रकरणात, बाहेरच्या जिल्ह्यातील सीपीआयच्या मुलासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. बेळगाव बाहेरील एका रिसॉर्टमध्ये हा सामूहिक बलात्कार झाला होता. साकीब नावाच्या व्यक्तीसह अन्य एका अल्पवयीन मुलाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी साकीब आणि एका अल्पवयीन मुलाला त्वरित अटक केली होती. आता सीपीआयचा मुलगा आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या रोहन पाटील व आशुतोष पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. रिसॉर्ट चालक रोहन पाटील आणि आशुतोष पाटील यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका घराला दरमहा २० हजार रुपयांना भाड्याने घेऊन त्याचे रिसॉर्टमध्ये रूपांतर केले होते. या सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. बेळगाव मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.अटक करण्यात आलेल्या सीपीआयच्या मुलाला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे.


Recent Comments