बेळगाव जिल्हा रुग्णालयात एका महिलेचा काल रात्री उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत उपचार देण्यासाठी डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नसल्याने ही घटना घडली.

बेळगावच्या विश्वेश्वरय्या नगर, संपीगे रोड येथील रहिवासी प्रभावती विष्णू मिरजकर यांना 19 मे रोजी तब्येत बिघडल्याने बेळगावच्या बीम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी रात्री त्यांची तब्येत आणखी बिघडली असता, तातडीच्या परीस्थितीत उपचार देण्यासाठी डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नसल्याने प्रभावती विष्णू मिरजकर यांचा मृत्यू झाला. बीम्स रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाबद्दल मिरजकर कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


Recent Comments