संतिबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली.

या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेत सीपीआय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी या प्रकरणात कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याशिवाय मुस्लिम समाजानेही सीपीआयंच्या निलंबनाची मागणी केली होती.
संतिबस्तवाड गावात ईदगाह मनोरा तोडफोड प्रकरणातही आरोपींना शोधण्यात त्यांनी निष्काळजीपणा दाखवला होता, असेही आयुक्तांनी सांगितले.
सीपीआयंच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या वतीने आज दुपारी ३ वाजता राणी चन्नम्मा सर्कल येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.


Recent Comments