बेळगांव : श्री दत्त पद्मनाभ पीठ तथा स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, श्री क्षेत्र तपोभूमी – गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित, अध्यात्म शिरोमणि सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री चांगळेश्वर मंदिर, यळ्ळूर – बेळगांव – कर्नाटक येथे दि. १४ मे रोजी गुरुपीठाच्या वैदिक शिष्यांच्या पौरोहित्याखाली सामुहिक उपनयन संस्कार समारंभ उत्साहात सुसंपन्न झाला. आपल्या घराचा समृद्ध वारसा ज्या पीढीकडे देऊ पाहतो त्या पिढीला संस्कारांनी मंडीत करण्याचा या पंचक्रोशीतील जनतेला एक अलौकिक योग यानिमित्त प्राप्त झाला आहे.


असे कृतार्थतेने पालकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर सुजन नाईक – संचालक – श्री दत्त पद्मनाभ पीठ, दिनेश भंडारी – सहकोषाध्यक्ष – संत समाज संघटना, सोमनाथ पाटील – संत समाज संघटना – बेळगांव जिल्हा कार्याध्यक्ष, नम्रता परुळेकर – श्री दत्त पद्मनाभ पीठ – ब्रह्मवादिनी संघटनेच्या प्रतिनिधी, रश्मी नाईक – अध्यक्षा – जगत् जननी, दिव्या भंडारी – कोषाध्यक्ष – जगत् जननी, वेदमूर्ती अनुपजी – प्रधानाचार्य – स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, लक्ष्मी मालेकर – अध्यक्षा यळ्ळूर ग्रामपंचायत, रुपा धामणेकर – अध्यक्षा एस्. डी. एम्. सी. सरकारी मराठी मॉडेल स्कूल, मनिषा घाडी, परशुराम पाटील, यल्लपा पाटील – देवस्थान पदाधिकारी, राजू उघाडे – समाज सेवक, रुपा पुण्यान्नावर व सुवर्णा बिजगरकर – ग्रामपंचायत सदस्या आदि. मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments