लहान वयातच मुलांना दर्जेदार शिक्षण देणे पालकांसाठी महत्त्वाचे असते. हेच दर्जेदार शिक्षण मुलांच्या भविष्याचा पाया रचते. बेळगावातील मुलांना उत्कृष्ट शिक्षण देऊन पालकांचा विश्वास संपादन केलेल्या ‘विविड माँटेसरी आणि प्राथमिक शाळेने’ आपल्या यशस्वी वाटचालीत आता तिसरी नवीन शाखा सुरू केली आहे. शहरातील यशानंतर आता ग्रामीण भागातील मुलांनाही इंग्रजी माध्यमातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही शाखा बेळगावच्या कलखांब येथे सुरू करण्यात आली आहे.


कलखांबमधील विविड माँटेसरी आणि प्राथमिक शाळेच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. चेअरमन आणि संस्थापिका श्रीमती रोहिणा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची प्रथा असताना, विविड शाळेने आपल्याच विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करून नवा आदर्श घालून दिला. दनीश अशफाक मुल्ला आणि मेहेदी शाहरुख जारे या विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलित करून शाळेचे उद्घाटन केले.

विविड माँटेसरी शाळेतील शिक्षण पद्धती आणि सुविधांबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालक झीनत म्हणाल्या, शहराप्रमाणेच आता आमच्या गावातही विविड सुरू झाल्याने आम्ही आमच्या मुलांना येथे दाखल केले आहे. शाळेतील वातावरण मुलांच्या शिकण्यासाठी अत्यंत पोषक आहे आणि शिक्षक मुलांची खूप काळजी घेऊन शिकवतात. पालक अश्विनी हिरोजी यांनी प्रशिक्षित शिक्षक आणि सुंदर वातावरणाचे कौतुक केले, तर पालक मनाली यांनी पोषक वातावरण, बस सेवा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले.
शाळेतील कर्मचारी महादेवी यांनी उत्कृष्ट सुविधा आणि दर्जेदार शिक्षणाचा अभिमान व्यक्त केला, तर शिक्षिका निवेदिता यांनी इंग्रजी संवादावर भर आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल करणे हे शाळेचे ध्येय असल्याचे सांगितले. शिक्षिका मंजुळा बुरुड यांनी ‘विविड’ या नावाचा अर्थ सांगून, ही संस्थापिका रोहिणा देसाई यांचे स्वप्न असल्याचे म्हटले.

शिक्षिका कश्मा यांनी शाळेच्या प्रवासाविषयी सांगताना, संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असून, आता ही तिसरी शाखा सुरू झाल्याचे नमूद केले. येथे सुरक्षित आणि पोषक वातावरणात शिक्षण दिले जाते तसेच विविध ॲक्टिव्हिटीजवरही भर दिला जातो.

शाळेच्या शिक्षण पद्धतीबद्दल माहिती मिळाल्याने अनेक पालकांनी नव्या शाखेत आपल्या पाल्यांना दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे पालकांनी स्वागत केले आहे.


Recent Comments