Belagavi

दिवसाढवळ्या बेळगावच्या हॅथवे केबलच्या कार्यालयात सुमारे चार लाखाची चोरी … !!!

Share

दिवसाढवळ्या, ८ महिलांनी एकत्र येऊन लाखो रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू चोरून पळ काढल्याची घटना बेळगाव काळी अंब्राई येथील हॅथवे केबलच्या कार्यालयात घडली आहे.

चिंध्या गोळा करणाऱ्या महिलांनी चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हॅथवे केबलच्या ऑफिसच्या गोडाऊनमध्ये लाखो रुपये किमतीच्या दोन बॅटरी, चार सॉकेट्स आणि एक लहान केबलसह अंदाजे रु. ४ लाख ५० हजार मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून कॅम्प पोलिस घटनास्थळी पोहचून तपास केला आहे.

Tags: