बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि कन्नड आणि संस्कृती विभागाने महर्षी भगीरथ जयंतीनिमित्त बेळगावमध्ये भव्य मिरवणूक काढली.

खासदार जगदीश शेट्टर यांनी किल्ल्यासमोरील अशोक सर्कल येथे मिरवणुकीचे उद्घाटन केले. यावेळी चित्रदुर्ग भगीरथ गुरुपीठाचे पुरुषोत्तमानंदपुरी स्वामीजी, नागेश चैतन्य स्वामीजी, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी ,कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालीका विद्यावती भजंत्री यांच्यासह इतर अधिकारी व उप्पर समाजाचे सदस्य उपस्थित होते. अशोक सर्कलपासून सुरू झालेले हे मिरवणूकीचे आरटीओ सर्कल मार्गे पुढे कुमारगंधर्व कला मंदिर येथे समारोप झाले.

मिरवणुकीत सहभागी झालेले होसदुर्गातील भगीरथ गुरुपीठाचे जगद्गुरु पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामीजी यांनी आपली मराठीशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्हा उप्पार समाज आणि जिल्हा प्रशासनाकडून महर्षी भगीरथ जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने आज बेळगावच्या मुख्य रस्त्यांवर भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ३०० हून अधिक सुहासिनी कुंभमेळ्यासह आणि लोककला पथके यात सहभागी झाले आहेत. भगीरथ ऋषी हे एक महान तपस्वी होते. ज्यांनी कठोर तपश्चर्येद्वारे देवगंगेला वश केले. सर्व प्राण्यांचे आणि मानवतेचे रक्षण केले. राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये ४ मे रोजी भगीरथ जयंती साजरी केली जात आहे.आपण भगीरथाच्या आदर्शांचे अनुसरण केले पाहिजे. आपल्या जीवनात महान गोष्टी साध्य केल्या पाहिजेत आणि भगीरथसारखे यशस्वी झाले पाहिजे.

यावेळी नागेश चैतन्य स्वामीजी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .


Recent Comments