केवळ एकमेकांकडे ‘टक लावून पाहण्याच्या’ क्षुल्लक कारणावरून तीन तरुणांमध्ये तुफान हाणामारी होऊन चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बागलकोट शहरात घडली आहे. या घटनेत तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बागलकोटमधील पंका मशिदीजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्ताफ, संदीप आणि सचिन नावाच्या तीन तरुणांमध्ये एकमेकांकडे ‘टक लावून पाहण्यावरून’ जोरदार वाद सुरू झाला. या वादानंतर त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले. पाहता पाहता प्रकरण चिघळले आणि त्यांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला.
यावेळी संदीप आणि सचिन यांनी अल्ताफवर हल्ला करून त्याला चाकू मारल्याचे सांगण्यात येत आहे, तर अल्ताफनेही त्यांच्यावर प्रतिहल्ला केल्याचे म्हटले जात आहे. या रक्तरंजित संघर्षानंतर तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बागलकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments