
सद्यस्थितीतील संवेदनशील परिस्थितीमध्ये खोट्या बातम्या पसरवून गैरसमज निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमशंकर गुळेद यांनी दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या आदेशानुसार आज बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. भीमशंकर गुळेद यांनी सांगितले. महत्त्वाच्या मंदिरांना, जलाशयांना सुरक्षा पुरवण्यात आली असून, जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांनाही योग्य ती सुरक्षा व्यवस्था दिली जाईल, असे ते म्हणाले. जातीय सलोखा बिघडवणारे पोस्ट डिलीट करण्यात आले असून, जिल्ह्यातील अशा एकूण १४ पेजेसवरील पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बेळगाव जिल्हा दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्यातील गॅस उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनाही योग्य ती सुरक्षा पुरवली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी स्पष्ट केले.


Recent Comments