बेळगावातील सरकारी बि.एड कॉलेजमध्ये भारतीय कुटुंब कल्याण संस्था आणि भारतीय रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा करण्यात आला.

बेळगावातील सरकारी शिक्षण महाविद्यालयात भारतीय कुटुंब कल्याण संस्था, भारतीय रेड क्रॉस सोसायटी आणि महाविद्यालयाच्या संयुक्त आयोजनाखाली वर्ल्ड रेड क्रॉस डे उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. ए.एन. श्रीकंठ हो होते तर या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. व्ही.सी. बावडेकर, डॉ. एस.बी. कुलकर्णी आणि विकास कलघटगी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर भारतीय कुटुंब कल्याण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. व्ही.सी. बावडेकर बोलताना म्हणाल्या, रेड क्रॉस संस्था मानवतेच्या क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल आहे. यावेळी आशियातील वाढती लोकसंख्या नियंत्रणाखाली आणण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीला नियंत्रित केल्यास, समाजातील प्रत्येकाच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमात डॉ. एस.बी. कुलकर्णी, विकास कलघटगी यांच्यासह कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रेड क्रॉस संस्थेचे पदाधिकारी देखील या प्रसंगी उपस्थित होते.


Recent Comments