DEATH

प्रेमाताई सबनीस यांचे मरणोत्तर देहदान

Share

बेळगावातील अनगोळ येथील प्रेमाताई जयंत सबनीस (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्ट, बैलहोंगल यांच्या माध्यमातून त्वचा आणि देहदान करण्यात आले.

त्यांची त्वचा केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयातील केएलई रोटरी स्किन बँकेला दान करण्यात आली. या त्वचेचा उपयोग भाजलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे. तसेच, त्यांचा देह हुबळी येथील केएलई जगद्गुरू गंगाधर महास्वामीजी तीनसाविर मठ वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी दान करण्यात आला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: