Belagavi

बेळगावात अँटी स्टॅबिंग पथकाची कारवाई

Share

बेळगाव शहरात मार्केट आणि एपीएमसी पोलिसांनी स्वतंत्र कारवाया करत तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली, तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अन्य एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

२७ नोव्हेंबर रोजी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाने स्वीकार हॉटेल आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तपासणी केली. यावेळी तलवार बाळगल्याप्रकरणी घी गल्ली येथील मोहम्मदबिलाल सफरराज पठाण याला पीएसआय हुसेन केरूर आणि पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभवनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या सत्यसाई कॉलनी येथील तन्वीर खासीमसाब सय्यद याच्याविरुद्ध पीएसआय विठ्ठल हावण्णवर यांच्या पथकाने अबकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या दोन्ही कारवायांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी कौतुक केले.

Tags: