Bagalkot

इळकल, हुनगुंदमध्ये १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

Share

बागलकोट जिल्ह्यातील इळकल आणि हुनगुंद शहरांत गेल्या १५ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे. आलमट्टी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील जॅकवेलची मोटार नादुरुस्त झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोटार बंद पडल्यामुळे इळकल, हुनगुंद आणि कोप्पळ जिल्ह्यातील कुष्टगी शहरांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दोन आठवड्यांपासून पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असून, प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पालकमंत्री विजयानंद काशप्पनवर यांनी जॅकवेलला भेट देऊन मोटार दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, सायंकाळपर्यंत किंवा एक दिवसात तिन्ही शहरांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिले.

Tags: