धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पीएसआय रमजान नदाफ यांनी ४८ हजार रुपयांची रोकड शोधून संबंधित महिलेला परत केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे पैसे परत मिळाल्याने महिला सुखावली असून, नदाफ यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
धारवाडमधील गांधी चौकाजवळ हॉटेलसमोर नरेंद गावातील सुवर्णा सोगल या महिलेचे ४८ हजार रुपये हरवले होते. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. तक्रारीची दखल घेत पीएसआय रमजान नदाफ यांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या २४ तासांत प्रकरणाचा छडा लावला. शोधलेली रोकड तिच्या मालकिणीकडे सुपूर्द करून त्यांनी या प्रकरणाची यशस्वी उकल केली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे धारवाडमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.



Recent Comments