गोकाकमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाविरोधात कारवाई करण्यात आली. जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत १५ प्रकरणे दाखल करून दंड आकारण्यात आला.
१८ नोव्हेंबर रोजी गोकाक तालुक्यात कोटपा कायदा २००३ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे, तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिराती करणारे तसेच शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना कायद्याची माहिती देण्यात आली.

तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ गुन्हे नोंदवून दंड आकारण्यात आला.
या मोहिमेत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या सल्लागार डॉ. श्वेता पाटील, समाजसेविका कविता राजण्णवर, तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाचे बी. बी. ईश्वरप्पगोळ, बाबू शेट्टप्पनवर, ईरण्ण तोरगळ आणि पोलीस विभागाचे जी. व्ही. राठोड सहभागी झाले होते.


Recent Comments