Belagavi

टिळकवाडी सेकंड गेटवरील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट हटविले

Share

बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४४ मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी सेकंड गेट येथील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला.

या परिसरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली. केवळ कचरा हटविण्यापुरते मर्यादित न राहता स्वच्छता ही प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असून, पर्यावरणाचे स्वच्छतेचे रक्षण करणे ही महापालिकेसोबतच नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले.

या मोहिमेत एल. व्ही. देसाई, महेश फगरे, वसंत हेब्बाळकर, गुरुनाथ काशीद, प्रकाश एच. आर. यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण मोहिते, महापालिका अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रभाग क्रमांक ४४ कचरामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.

Tags: