सामाजिक कार्य, जनहिताच्या प्रश्नांवरील लढा तसेच शोषित, वंचित आणि असहाय्य घटकांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या प्रतिभा अशोक कांबळे यांना प्रतिष्ठेचा ‘समाजसेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डिजिटल मीडिया असोसिएशन ऑफ कर्नाटक अर्थात डी-मॅकच्या वतीने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगावात आयोजित कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील कुंभार यांच्या हस्ते प्रतिभा कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ. हरिद्वार अघोरी अम्माजी, झी कन्नड वाहिनीवरील कॉमेडी स्टार लया कोकिळा, बिग बॉस कन्नडच्या चौथ्या पर्वाचे विजेते आणि अभिनेते प्रथम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

समाजातील अन्याय, शोषण आणि विषमतेविरोधात आवाज उठवतानाच सर्वसामान्यांच्या समस्यांना प्रतिसाद देत प्रतिभा कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार हा केवळ सन्मान नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधिक दृढ करण्याची प्रेरणा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांचे सामाजिक कार्य पुढे सुरू राहावे, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रतिभा अशोक कांबळे यांना मिळालेला ‘समाजसेवा रत्न’ पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव ठरला आहे.


Recent Comments