Belagavi

बेळगाव : मारुती नगरमध्ये नवीन कूपनलिका कामाचा शुभारंभ

Share

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या सूचनेनुसार युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध प्रभागांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मारुती नगरमध्ये नवीन कूपनलिका कामाचा शुभारंभ करण्यासह विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली.

मारुती नगरमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नवीन कूपनलिका उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे. यावेळी नागरिकांशी संवाद साधत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

त्यानंतर उज्ज्वल नगरच्या दुसऱ्या क्रॉसला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या समस्या आणि परिसरातील आवश्यक विकासकामांची माहिती घेण्यात आली. तसेच किल्ला तलाव परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी करण्यात आली. हा परिसर वर्दळीचा असल्याने कामात कोणतीही त्रुटी न ठेवता दर्जेदार आणि जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या. कामामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले.

Tags: