Belagavi

कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या वृद्ध गाईची चव्हाट गल्लीतून सुटका

Share

बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथील रहिवासी पुंडलिक गावडेवाडकर यांच्या घरी एक वृद्ध गाय असल्याचे समजताच गो रक्षा पथकाने तातडीने तेथे पोहोचून गाईला सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि गोशाळेत पोहोचवले.

नागरिकांना वृद्ध जनावरांचा सांभाळ करणे शक्य नसेल तर त्यांना कत्तलखान्यात न पाठवता तातडीने ८०७३५५६३५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. गो रक्षा पथक घटनास्थळी पोहोचून जनावरांना सुरक्षितपणे गोशाळेत पोहोचवण्यास मदत करेल, असे आवाहन समाजसेवक व गोरक्षक नीलेश यांनी केले आहे.

या मोहिमेत नीलेश, शंकर, पुंडलिक आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Tags: