Belagavi

येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदिरात विजयादशमीचा भक्ती उत्साह

Share

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे श्री चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर ‘श्री माउली संगीत सोंगी भजनी मंडळ’ यांच्या वतीने विशेष संगीत भजन आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला.

येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर प्रांगणात मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी विलास घाडी, उद्योजक अमित पाटील व रोहन हांगीरगेकर यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी दसरा सीएम कप कुस्तीपटू विनायक पाटील, निवृत्त सैनिक, स्थानिक गुणवंत आणि सोशल मीडिया कार्यकर्त्यांचा विश्वस्तांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील ‘श्री माउली’ पथकाने सादर केलेल्या सोंगी भजनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. येळ्ळूर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी या जागरणात सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घेतला.

Tags: