Belagavi

जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरीतर्फे बाईक रॅलीचे आयोजन

Share

जागतिक पोलिओ दिनाचे औचित्य साधून रोटरी बेळगाव परिवारतर्फे पोलिओ निर्मूलनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या CPED मैदानावरून सुरू झालेली ही बाईक रॅली महानगरपालिका आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ झाली. पोलिओ प्रतिबंध आणि त्याच्या निर्मूलनासाठी रोटरी संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमाला आयुक्त व प्रशासनाकडून पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला.

या जनजागृती रॅलीमध्ये बेळगावमधील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, इनर व्हील क्लबचे सदस्य, बिम्सचे (BIMS) प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळवून देणे आणि पोलिओमुक्त जगाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्तांसह रोटरीचे माजी जिल्हा गव्हर्नर (PDG) अविनाश पोतदार, बबन देशपांडे, अशोक नायक, सहाय्यक गव्हर्नर (AG) जयदीप सिद्धण्णावर, रवी हट्टारकी, रमेश रामगुर्वाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: