hubali

हुबळीत पतंगाच्या मांजाने घेतला महिलेचा बळी

Share

हुबळीत पतंगाच्या मांजामुळे आणखी एका महिलेचा नाहक बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्कूटीवरून जात असताना गळ्यात पतंगाचा मांजा अडकल्याने गंभीर दुखापत होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला.

जुने हुबळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध सिद्धारूढ मठाजवळ हा अपघात घडला. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यंत धोकादायक मांजामुळे महिलेचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, अशा बंदी घातलेल्या आणि जीवघेण्या मांजाच्या वापरावर व विक्रीवर तत्काळ कडक बंदी घालून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्यांमधून केली जात आहे.

Tags: