कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या हुतात्मा पोलिसांच्या स्मृतीस हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.


हुबळी येथील सीएआर मैदानावर आयोजित पोलीस हुतात्मा दिन कार्यक्रमाचा प्रारंभ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. विजय यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून झाला. कर्तव्य बजावताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या पोलिसांच्या त्यागाचे स्मरण करत पोलीस पथकांनी आकर्षक संचलन केले, तसेच हवेत फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या सोहळ्यास पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




Recent Comments