कित्तूर उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याचा तलवार धरलेला हात तुटल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, लिफ्टच्या साहाय्याने पुतळ्याची स्वच्छता करताना कामगारांच्या अनावधानाने चन्नम्मांच्या हाताचा भाग तुटला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने तातडीने पुतळा भगव्या कपड्याने झाकला.

बैलहोंगलचे डीएसपी वीरय्या हिरेमठ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या कित्तूर पोलीस तेथे तैनात असून, हानी झालेल्या हाताची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


Recent Comments