सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बेळगावातील समर्थ नगर येथील ‘एसटीएम श्री नवरात्रोत्सव मंडळ’तर्फे यंदाच्या नवरात्रौत्सव सोहळ्यात अनाथ बालकांसोबत सणाचा आनंद द्विगुणित करत मंडळाने आदर्श नवरोत्सव साजरा केला.
समर्थ नगर येथील ‘सार्वजनिक श्री नवरात्रोत्सव मंडळ एसटीएम’च्या वतीने ‘मक्कळ धाम’ आश्रमातील बालकांच्या हस्ते श्रीदेवीची महाआरती पार पडली. भव्य आणि विलोभनीय देवीची मूर्ती पाहून लहान मुलांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि आनंदाचे वातावरण पसरले होते.

आरतीत सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाला सन्मानित करून पूजेनंतर मिठाई आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘मक्कळ धाम’च्या शिक्षिकांनी, बेळगावात आम्हाला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला निमंत्रित करणारे केवळ समर्थ नगरचे नागरिकच आहेत, अशा शब्दांत भावूक होऊन एसटीएम मंडळाचे आभार मानले.


Recent Comments