कारगिल युद्धात देशसेवा बजावणारे रामदुर्ग तालुक्यातील उज्जैनकोप्प येथील प्रादेशिक सेनेचे माजी सैनिक मल्लिकार्जुन रेड्डरट्टी (वय ५३) यांचे गंभीर आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदीर्घ आजारपणामुळे त्यांना केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी उज्जैनकोप्प येथे प्रादेशिक सेनेचे अधिकारी, सैनिक, प्रादेशिक सेना माजी सैनिक कल्याण संघ आणि यरगट्टी तालुका माजी सैनिक संघाच्या वतीने धार्मिक विधींसह अंत्यसंस्कार संपन्न झाले.

या प्रसंगी प्रादेशिक सेना माजी सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विलास जंगली, चंद्रशेखर सवडी यांच्यासह परिसरातील शेकडो माजी सैनिक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अमर जवानाला अंतिम निरोप दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली आणि मोठा परिवार आहे.


Recent Comments