Vijayapura

तेलवाहू टँकर उलटल्याने रस्त्यावर तेलाचा सडा; तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड !

Share

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील होर्तीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑइल टँकर उलटल्याची घटना घडली आहे.

टँकर उलटताच आजूबाजूच्या नागरिकांनी ऑइल भरून घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. हातात भांडी आणि कॅन घेऊन महिला व पुरुषांसह अनेक जण घटनास्थळी जमा झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच होर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ही घटना होर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: