विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त विजापूर सायकलींग ग्रुप, कोटी वृक्ष अभियान आणि वन विभागातर्फे पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला.

ज्ञानयोगाश्रमाचे बसवलिंग स्वामीजी यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचे औचित्य साधून ६३ रोपांची लागवड करण्यात आली. हरित विजापूर निर्माण करण्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी विजापूर सायकलींग ग्रुपचे सदस्य, कोटी वृक्ष अभियानाचे कार्यकर्ते आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनी केला.
Vijayapura
मंत्री डॉ. एम. बी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ६३ रोपांची लागवड


Recent Comments