Belagavi

केईआरसी बैठकीत वीज स्वयं-प्रमाणपत्राच्या प्रस्तावाला तीव्र विरोध

Share

बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित ‘कर्नाटक विद्युत नियामक आयोगा’च्या (केईआरसी) जनसुनावणीत १५० केव्हीपर्यंतच्या कमी दाबाच्या वीज जोडणीसाठी मालकांनीच स्वयं-प्रमाणपत्र (Self-Certification) देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.

आयोगाचे अध्यक्ष पी. रविकुमार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत, वीज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानाधारक वीज कंत्राटदारांमार्फतच तपासणी आणि प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. प्रक्रिया सुलभ करण्याच्या नावाखाली सुरक्षेची जबाबदारी सामान्य ग्राहकांवर टाकणे अयोग्य असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक प्रभाकर नागरमुनवल्ली यांनी उद्योगांमधील विजेच्या समस्यांकडे लक्ष वेधले. जुनीच पद्धत सुरू ठेवावी आणि नवीन सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Tags: