Dharwad

धारवाडमध्ये केपीएससी गैरव्यवहाराविरोधात आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच

Share

केपीएससी गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू असून उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.

धारवाड विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून केपीएससी पशुवैद्यकीय भरतीतील गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपवेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, उपोषणाचा तिसरा दिवस असून अनिल कांबळे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.

आंदोलनस्थळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन अनिल कांबळे यांच्या आरोग्याची तपासणी केली. केपीएससी गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत आंदोलकांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Tags: