Belagavi

महिला, मुलांवरील अत्याचार सहन करणार नाही: नागलक्ष्मी चौधरी

Share

बेळगाव जिल्ह्यात १५९ पोक्सो गुन्हे दाखल झाले असून महिला व मुलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी दिला.

मंगळवारी बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे, तसेच अशा प्रकरणांमध्ये दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बिम्स रुग्णालयात गरोदर महिलांना रक्त तपासणीसह इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी एकाच छताखाली सोयीस्कर व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच रुग्णालयातील सर्व स्वच्छतागृहे तात्काळ वापरासाठी खुली करून त्यांची स्वच्छता राखण्याचे आदेश बिम्स अधिकाऱ्यांना दिले. सरकारी रुग्णालयांमध्ये महिला व बालकांना सन्मानजनक आणि दर्जेदार सेवा मिळायला हवी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Tags: