बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्ते विकासाला गती देत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी एकूण २० कोटी रुपयांच्या प्रमुख रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ केला.



मंगळवारी सकाळी बेळगाव शहरातील चिकूबाग परिसरात ११ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचे भूमिपूजन केल्यानंतर, त्यांनी ग्रामीण भागात ९ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना सुरुवात केली. यामध्ये बेळवट्टी ते कर्ले आणि कवळेवाडी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी ५ कोटी रुपये, तर कुद्रेमनी आणि सोनोली जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.



ग्रामीण भागाचा विकास हेच आमचे मुख्य ध्येय असून मतदारसंघातील प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ते आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. याप्रसंगी युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, स्थानिक ग्रामस्थ आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




Recent Comments