Dharwad

गृहमंत्री आणि प्रशासनाला चक्रवर्ती सुलीबेले यांचे थेट आव्हान

Share

माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असून हिंमत असेल तर गृहमंत्री आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून दाखवावा, असे थेट आव्हान वक्तृत्वपटू व विचारवंत चक्रवर्ती सुलीबेले यांनी दिले. धारवाड येथे आयोजित तिरंगा रॅलीत ते बोलत होते.

बंगळुरू येथे आयोजित तिरंगा रॅलीस सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस बळ नाही म्हणून तिरंगा यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातील कानाकोपऱ्यात तिरंगा यात्रा काढणारच, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना त्यांनी तरुणाईचे कौतुक केले. ‘जेन-जी’ (Gen-Z) पिढी देशविरोधी नसून ती देशाचा गौरव उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. संसदेवर दगडफेक करण्यासाठी किंवा जाळपोळ करण्यासाठी ही पिढी जन्माला आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

धारवाडमधील तरुण हातामध्ये तिरंगा घेऊन उत्साहाने सहभागी झाले असून, ही रॅली म्हणजेच गृहमंत्री आणि प्रशासनाच्या भूमिकेला चपराक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दिल्ली आणि इतर राज्यांमधील आंदोलनांच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Tags: