बेळगाव मधील उद्यमबाग येथे श्री श्री राधा दामोदर मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पाच दिवसीय धार्मिक महोत्सव उत्साहात पार पडला.

बेळगावच्या उद्यमबाग येथील जीआयटी कॉलेज रस्त्यावरील श्री श्री राधा दामोदर मंदिरात भक्तिवेदांत सेवा संघ आश्रमातर्फे १ ते ५ सप्टेंबर दरम्यान श्री श्री राधा दामोदर प्राणप्रतिष्ठा आणि पाच दिवसीय धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र उत्सवात श्री श्री राधा दामोदर यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवही भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

पाच दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमात दररोज हरिनाम संकीर्तन, भजन, आध्यात्मिक प्रवचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

५ सप्टेंबर रोजी या महोत्सवाची सांगता झाली. या सांगता समारंभाच्या दिवशी ५ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिवेदांत सेवा संघ आश्रम आणि मंदिर समितीच्या सहकार्याने हा धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



Recent Comments