बेळगावच्या कलाश्री उद्योग समूहाच्या लकी ड्रॉचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या दोन क्रमांकांची बक्षिसे समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर आणि श्रीराम सेनेच्या अध्यक्षांसह मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.


उद्योग क्षेत्रातील कार्यकर्ते पी. आर. कुंभार, सदानंद शिवानंद, निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक ज्योतिदित्य पळ्ळूरकर, जादूगार प्रेमानंद पाटील गोवा, चौधरी पाटील डोळेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.


धामणे येथील कुरबरहट्टीचे शिवन्या मनोहर यळ्ळूरकर यांना महिंद्रा ट्रॅक्टर आणि दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. बेळगावच्या भाग्यनगर येथील प्रसाद चंद्रकांत वंटमुरी यांना क्विड कार आणि दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.

कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख बक्षीस विजेते
महिंद्रा ट्रॅक्टर आणि दीड लाख रुपये रोख: शिवन्या मनोहर यळ्ळूरकर, कुरबरहट्टी, धामणे
क्विड कार आणि दीड लाख रुपये रोख: प्रसाद चंद्रकांत वंटमुरी, भाग्यनगर, बेळगाव
बैलजोडी किंवा एक लाख रुपयांचा रोख व्हाउचर: यल्लप्पा मारुती विळगोजी, हळगा, बेळगाव
आयफोन: सरिता लक्ष्मीबाई कुगजी
२५० ग्रॅम चांदी: ऋतुजा रवळ बागिलगेकर
इलेक्ट्रिक स्कूटर: विनायक नारायण पाटील
कलाश्री सोफा सेट: समर्थ विजय बेनके
शिवणयंत्र: लक्ष्मी देवेंद्र मजुकर
१५० लिटर सौर वॉटर हीटर: शांता सर्जेराव दळवी
६५ हजार रुपये किमतीचे बक्षीस: शिवानी लक्ष्मण पाटील
१ एचपी आटा चक्की: समीक्षा निखिल काकतकर
१ ग्रॅम सोने: मारुती जीवन देसाई
२१ हजार रुपये रोख: गायत्री दिलीप शिंदे
५० हजार रुपयांची एफडी: राजेसाब रसूलसाब पनारी
कार्यक्रमाला कलाश्री उद्योग समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.


Recent Comments