Belagavi

राहुल जारकीहोळी यांच्याकडून मृत विणकराच्या कुटुंबाला धीर

Share

बेळगाव येथील वडगाव साई नगर येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विठ्ठल लोकरी यांच्या निवासस्थानी केपीसीसी सरचिटणीस राहुल जारकीहोळी यांनी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला.

वडगाव साई नगर येथील रहिवासी विठ्ठल लोकरी यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच काँग्रेस नेते तथा डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

या प्रसंगी बेळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीप एम.जे., केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: