Belagavi

कपिलेश्वर देवस्थान येथे नागपंचमीनिमित्त धार्मिक विधी

Share

श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी बेळगाव शहरात सोमवारी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक कपिलेश्वर देवस्थान येथे सकाळपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले.

कपिलेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची उपस्थिती होती. महिलांनी रांगेत उभे राहून नागमूर्तीला दुग्धाभिषेक केला. तसेच हळद, कुंकू आणि फुले वाहून पूजा अर्चा करण्यात आली.

शहरातील इतर मंदिरांमधील नागमूर्तींवरही भाविकांनी दुग्धाभिषेक केला. काहींनी मातीची नागमूर्ती आणून घरातच पूजन केले.

नागपंचमीनिमित्त आज घरोघरी फराळासहित पंचपक्वान्नांचा बेत करण्यात येतो. तसेच विविध भागांत झाडांना आणि अंगणात झोके बांधून खेळण्याची परंपरा देखील जपण्यात येते. याच पार्श्वभूमीवर श्री कपिलेश्वर देवस्थानात नागपंचमी आणि पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.

Tags: