श्रावण महिना आणि नागपंचमीचे औचित्य साधून विजापूर शहरातील शिवगिरी क्षेत्रात आज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.


पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त रुद्राभिषेक, बुत्ती पूजा आणि फळांचा अभिषेक करण्यात आला. तसेच नागपंचमीनिमित्त नागदेवतेला विशेष पूजा आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. शेकडो भाविकांनी पदयात्रेने शिवगिरी येथे येत ‘हर हर महादेव’चा जयघोष केला.

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त विजापूर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवगिरी क्षेत्रात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच पंचामृत, दूध आणि पाण्याने शिवलिंगास अभिषेक घालण्यात आला. महिला भाविकांनी शिवलिंगाला आकर्षक आरास करण्यात अली होती.
नागपंचमीनिमित्त शिवगिरी येथील सुमारे १० फूट उंच आणि सात फण्यांच्या नागमूर्तीला दुग्धाभिषेकासह विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. सुब्रह्मण्य क्षेत्राच्या धर्तीवर येथे नागदोष निवारण आणि धार्मिक विधी पार पडत आहेत. आगामी काळात शिवगिरी परिसरात ‘नागबण’ स्थापन करण्याचा मानस असून, नागमूर्ती दान करू इच्छिणाऱ्या भाविकांनी पुढे यावे, असे आवाहन शिवगिरी प्रशासनाने केले आहे.
श्रावणातील भक्ती आणि नागपंचमीच्या पूजनाने आज शिवगिरी क्षेत्रात आध्यात्मिक उत्साह पाहायला मिळाला.
विजयकुमार सारवाड, इन न्यूज, विजापूर.


Recent Comments