स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या नवनिर्मित सभागृहाचे डीसीपी नारायण बरमनी यांच्या हस्ते शनिवारी अधिकृत उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन समारंभाला एसीपी संतोष सत्यानाईक आणि सीपीआय कालीमिरची हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी ठाण्याचे पीएसआय आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सभागृहामुळे पोलीस ठाण्यातील दैनंदिन कार्यालयीन कामे, बैठका आणि कार्यक्रम आयोजित करणे अधिक सोयीचे होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



Recent Comments