Belagavi

रंगसंगीत महिला कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात रंगणार नाटकाचा प्रयोग!

Share

कन्नड व संस्कृती विभाग आणि दावणगेरे येथील व्यावसायिक रंगभूमी रंगायण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिनयसहित रंगसंगीत महिला प्रशिक्षण कार्यशाळेचा’ समारोप आणि रंगप्रदर्शन आठ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.

बेळगाव येथील कन्नड भवन येथे शनिवारी, आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी या रंगप्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत, अशी माहिती दावणगेरे रंगायणचे संचालक मल्लिका अर्जुन कडकोळ यांनी दिली.

या वेळी बेळगाव विभागाच्या प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी समारोपीय भाषण करतील, तर मल्लिका अर्जुन कडकोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्याला कन्नड व संस्कृती विभागाचे सहसंचालक के. एच. चन्नूर, सरजू काटकर, महांतेश गजेंद्रगड, वाय. आर. पाटील, प्रा. बसवराज जगजंपी, डॉ. डी. एस. चौगुले, डॉ. रामकृष्ण मराठे, पंडित राजप्रभू धोत्रे आणि शिरीष जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे मल्लिका अर्जुन कडकोळ यांनी सांगितले.

Tags: