डॉ. जी. परमेश्वर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेळगावातील सदाशिवनगर येथील पोस्ट मॅट्रिक मुलींच्या वसतिगृहासह शहरातील चार शासकीय वसतिगृहांना भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले.


विद्यार्थ्यांना बुद्धांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी आणि सामाजिक समतेचा संदेश पोहोचावा या उद्देशाने राज्यभरातील शासकीय वसतिगृहांना बुद्धांची मूर्ती देण्याचे अभियान राबवले जात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि बुद्धांची शांती, समता व मानवतेची तत्त्वे स्मरणात आणली.


या प्रसंगी दलित नेते सुरेश तलवार, मल्लेश चौगुले, यशवंत सम्राट, यमनप्पागडी नायक, किरण चावले, सुधीर चौगुले, सिद्राया चौगुले, प्रकाश चम्मण्णावर, समाज कल्याण विभागाचे बसवराज चन्यणावर आणि वसतिगृह गृहपाल नीलावती बाजंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments