Belagavi

तुम्मरगुड्डी गावात असुविधेमुळे ग्रामस्थ हैराण

Share

बेळगाव तालुक्यातील तुम्मरगुड्डी गावात स्वच्छतेचा अभाव निर्माण झाला असून, साथीच्या रोगांच्या भीतीखाली नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. गटारांची दुरुस्ती आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत ग्रामपंचायत उदासीन ठरल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

तुम्मरगुड्डी गावात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. योग्य देखभालीअभावी कचरा साचून गटारे तुंबली असून, दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. अनेक ठिकाणी गटाराचे पाणी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचल्याने ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

याच दरम्यान गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतही अस्वच्छता असून, नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही ग्रामपंचायत अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Tags: