Belagavi

बेळगावमध्ये ‘ड्रग्समुक्त समाज आणि रस्ते सुरक्षा’ जनजागृती बाइक रॅली

Share

युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेशी संबंधित जनजागृती करण्यासाठी बेळगाव येथे ‘जय कर्नाटक जनपर वेदिके’च्या वतीने जनजागृती बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

तरुणांमध्ये ड्रग्सचे सेवन आणि व्यसनाधीनता वाढत असून, त्यामुळे देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ड्रग्सला नकार देऊन निरोगी समाज निर्माण करणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करून ‘हेल्मेट वापरा, जीव वाचवा’ असा संदेश देण्यासाठी या बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

युवाशक्ती हीच देशाची ताकद आहे, चुकीच्या मार्गाने येणाऱ्या ड्रग्समुळे तरुण वर्ग भरकटण्यापासून रोखणे आणि रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा उद्देश असल्याचे जय कर्नाटक जनपर वेदिकेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवरड्डी लक्ष्मणरेड्डी यांनी सांगितले.

ही जनजागृती बाइक रॅली बेळगावमधील प्रमुख मार्ग असलेल्या राणी चन्नम्मा चौकातून सुरू होऊन आरटीओ चौक, मार्केट पोलीस स्टेशन, खडेबाजार आणि लिंगराज कॉलेजमार्गे पुनश्च चन्नम्मा चौकात येऊन समाप्त झाली.

Tags: