Belagavi

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी स्वप्नील शहा यांची निवड

Share

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी स्वप्नील शहा यांनी पदभार स्वीकारला आहे.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) नवीन कार्यकारिणीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी स्वप्नील शहा, ज्येष्ठ उपाध्यक्षपदी उदय जोशी तर द्वितीय उपाध्यक्षपदी राजेंद्र मुतगेकर यांची निवड झाली आहे. मानद सचिवपदी मनोजकुमार एन. मत्तीकोप, सहसचिवपदी विनीत हरकुणी आणि खजिनदारपदी रमेश लद्दड यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

माजी अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी आणि माजी सचिव सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी झालेल्या २०२५-२६ या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळत्या अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेत व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील आजीव व वार्षिक सदस्यांचा समावेश असलेली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Tags: