Belagavi

कलबुर्गी महापालिकेच्या पथकाकडून बेळगाव महापालिकेला भेट

Share

कलबुर्गी महापालिकेच्या अभ्यास पथकाने बेळगाव महापालिकेला भेट देऊन कर संकलन पद्धत आणि स्वच्छता व्यवस्थापनाची माहिती घेतली.

कलबुर्गी महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनुपमा रमेश कमतनूर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास पथकाने बेळगाव महापालिकेला भेट दिली. या वेळी बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, सभागृह नेते संतोष पेडणेकर आणि स्थायी समिती सभापती यांची भेट घेऊन विकासकामांवर चर्चा करण्यात आली. आयुक्तांच्या सूचनेनुसार बेळगावात राबवल्या जाणाऱ्या महसूल कर संकलन आणि इतर कामकाज पद्धतीचा या भेटीत अभ्यास करण्यात आला.

कलबुर्गी महापालिका क्षेत्रात ५५ प्रभाग असून कर संकलन वाढवण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी बेळगाव महापालिकेच्या उत्तम मॉडेलची पाहणी केली जात आहे, असे कलबुर्गी महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अनुपमा रमेश कमतनूर यांनी सांगितले.

या बैठकीला महापालिकेचे प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.

Tags: