बेळगाव उत्तर मतदारसंघातील माळमारुती परिसरातील अंजनेयनगर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता, गटार तसेच शैक्षणिक सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली.


बेळगावच्या माळमारुती विस्तारातील अंजनेयनगर आणि परिसरात सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या रस्ता आणि गटार बांधकामाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांनी या कामांची पाहणी केली.


नागरी सुविधांबरोबरच मूलभूत सुविधांची कमतरता असलेल्या सरकारी शाळेसाठी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली नवीन स्वच्छतागृह आणि अतिरिक्त वर्गखोली बांधण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाला आपले प्रथम प्राधान्य असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.

शाळेतील शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिक आणि शाळा व्यवस्थापनाने आमदारांचे आभार मानले. यावेळी नामनिर्देशित नगरसेवक दिनेश नाशीपुडी, स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments