hubali

जोशींवरील टीकेवरून प्रियांक खर्गेंना टेंगिनकायींचा टोला

Share

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हुबळी-धारवाड महापालिकेचे महापौर होण्यासही पात्र नाहीत, या मंत्री प्रियांक खर्गे यांच्या टीकेवर आमदार महेश टेंगिनकायी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

हुबळी येथे बोलताना टेंगिनकायी म्हणाले की, प्रल्हाद जोशी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीशिवाय, संघ स्वयंसेवक म्हणून काम करत भाजपच्या बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असून, आपल्या कष्टाने केंद्रीय मंत्री झाले आहेत.

प्रियांक खर्गे यांनी प्रसिद्धीसाठी अशी अनावश्यक विधाने करू नयेत आणि प्रल्हाद जोशी यांच्याबद्दलचे आपले विधान तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, प्रसाद अब्बय्या हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते मंत्री होण्यास पात्र होते, पण त्यांच्या हक्काचे मंत्रीपद प्रियांक खर्गे यांनी हिसकावून घेतले, असा टोला त्यांनी लगावला.

प्रियांक खर्गे हे केवळ त्यांच्या वडिलांच्या राजकीय प्रभावामुळेच आज मंत्री पदावर बसले आहेत, असा गंभीर आरोपही महेश टेंगिनकायी यांनी या वेळी केला.

Tags: