बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी देशसेवेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.

माजी मानद कॅप्टन चंगप्पा पाटील यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, भारताने युद्धाच्या प्रसंगी शत्रूला नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगितले. सैनिकांच्या शौर्यामुळेच आज देश सुरक्षित आहे, असे त्यांनी नमूद केले. सुभेदार मेजर कल्लाप्पा पाटील यांनी एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि शिस्त निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

मेजर डॉ. महेश गुरनगौडर यांनी प्रास्ताविकात भारताच्या ऐतिहासिक विजयांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी डॉ. जी. एन. शीलী होते. कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


Recent Comments