बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तरुणांना ड्रग्जपासून पूर्णपणे दूर राहण्याचे आवाहन केले.


विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना ठामपणे नकार दिला तरच मागणी घटून हे बेकायदेशीर जाळे उद्ध्वस्त करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीवर भर देण्याचे सांगत, एनडीपीएस कायद्यांतर्गत तपास करताना पोलिसांनी तांत्रिक चुका टाळाव्यात, असे निर्देश दिले.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात ‘सन्मित्र’ मोहीम राबवत असल्याचे सांगून, सर्व शिक्षण संस्थांमध्ये ‘अँटी ड्रग्ज कमिटी’ स्थापन केली जात असल्याची माहिती दिली.
या वेळी वकील संघाचे अध्यक्ष बी. जे. गंगाई, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, आरोग्य अधिकारी आय. पी. गडाद व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments